इचलकरंजी / प्रतिनिधी:
इचलकरंजी येथे बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डरांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बिरला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी, टेक्निकल इंचार्ज आशिष मांडे, सेल्स प्रमोटर नितीन धूत, ब्रँच मॅनेजर जयवंत लोखंडे, असिस्टंट मॅनेजर शादाब शिलेदार सेल्स ऑफिसर दिपक सावंत, अनिल भंगे, क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असो. अध्यक्ष विवेक सावंत, बिल्डर असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट फैयाज गैबान यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी केले. त्यानंतर प्रास्ताविकपर भाषणात नितीन धूत यांनी सर्वांनी बिरला शक्ती सिमेंट कंपनीला दिलेली भक्कम साथ व कंपनीवर दाखवलेला विश्वास अनमोल असून येथून पुढच्या काळातही हा विश्वास व आपली सोबत कायम ठेवावी, असे आवाहन केले.
बिरला शक्ती सिमेंटचे टेक्निकल इंचार्ज आशिष मांडे यांनी बिरला शक्ती सिमेंट विषयी माहिती देत उत्पादनाच्या तांत्रिक बाबी त्याचबरोबर गुणवत्तेची व बिरला शक्ती पीपीसी सिमेंट इकोफ्रेंडली असल्याची माहिती आपल्या प्रेजेंटेशनद्वारे दिली.
यावेळी इचलकरंजीचे आर्किटेक्ट विठ्ठल तोडकर यांना ‘आयकॉन ऑफ एशिया’ या पुरस्काराने आणि आर्किटेक्ट महांतेश कोक्कळकी यांना ‘बेस्ट इंटेरिअर डिझायनर’ या पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी यांनी मानले. या मेळाव्यास इचलकरंजी परिसरातील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर मोठ्या संख्येने उपस्थित होते.