You are currently viewing सण दीपावली व दीपोत्सव

सण दीपावली व दीपोत्सव

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल प्राविण्य, गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*

*🌹सण दीपावली व दीपोत्सव🌹*

आपला भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. सणांमध्ये सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी अथवा दीपावली या सणाकडे पाहिले जाते. भारतात सर्वत्र साजरा होणारा हा सण पावसाळा संपून (हल्ली हवामान बदल होऊन अवेळी पाऊस कोसळतो. असो) नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते, त्या काळातच झाला असे म्हणतात. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायनी या तीन यज्ञांचे एकीकरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा अशीही कल्पना आहे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, १४ वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात. त्याचमुळे अयोध्येतल्या प्रजेने आनंदाने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी दीपावली सण चालू झाला. पुराणात दीपावली संबंधी अजून एक आख्यायिका आहे. ही कथा प्राचीन काळातील महाबलाढ्य राजा बळी आणि वामन या कथेशी जोडलेली आहे. राजा बळी आणी वामन ह्यांची गोष्ट आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावस्या या तीन दिवसात घडलेली व त्याच कारणाने या तीन दिवसांत जो कोणी या प्रित्यर्थ दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाही व त्याच्या घरात निरंतर लक्ष्मीचे वास्तव्य असेल अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरु झाली आणि तेव्हापासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीचे दिवस म्हणून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव साजरा करू लागले.

आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्यावेळी जे देव राजे व भक्त तिथे उपस्थित होते, त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. आपला ज्ञानदीप निघून गेला आहे. आता आपण साधे दिवे लावून प्रकाश कायम ठेवू या असा जैनांनी विचार केला, तेव्हापासून महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वराची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले व जैनांनी ही तिथी महत्त्वाची मानून वीर निर्वाण संवत नावाचा एक नवा शके चालू केला.
अजून एक ऐतिहासिक कल्पना अशी आहे की सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. तर दुसरी कल्पना अशी आहे की, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली. त्यालाच दीपावली हे नाव पडले असावे.

दीपावली हा एक धार्मिक उत्सव असून, या उत्सवात निरनिराळ्या दिवशी जे धार्मिक विधी केले जातात त्याचे विस्तृत वर्णन पुराणात वाचावयास मिळते. सारांशत:
*धनत्रयोदशी*
धनत्रयोदशी, आश्विन वद्य त्रयोदशी. या दिवशी घरातील सर्व धनाची सोने- नाणे व अलंकार स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे.

*नरक चतुर्दशी*
आश्विन वद्य चतुर्दशी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राजाचा (राक्षसाचा) वध केला. ह्या नरकासुराने १६,१०८ स्त्रियांना आपल्या बंदीवासात ठेवले होते. श्रीकृष्णाने राक्षसाचा वध करून त्या बायकांना सोडवले व त्या सर्वांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. तो हा दिवस. या दिवशी पहाटेला जो कोणी तेल उटणे लावून गरम पाण्याने स्नान करेल त्याला नरकाच्या पीडा होणार नाहीत, अशी आख्यायिका आहे.

*लक्ष्मीपूजन*
लक्ष्मीपूजन, आश्विन अमावस्येच्या संध्याकाळी करतात. व्यापारी लोक आपल्या नूतन वर्षाच्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. बलिप्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा तेव्हा बळीची पूजा केली जाते. याच दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा असल्याने घराच्या अंगणात शेणाचा पर्वत करून त्याची पूजा करतात. गोठ्यातील गायी- बैलांना सजवून त्यांची पूजा करतात. दिन- दिन दिवाळी…गाई म्हशी ओवाळी… अशा पद्धतीची गाणी ही रचलेली आहेत.

*भाऊबीज, यमद्वितीया*
बहीण भावाला ओवाळणी करते व भाऊ बहिणीला प्रेमाची भेट देत असतो.
दिवाळीत पणत्यांची रोषणाई व आकाश कंदिल लावण्याची प्रथा आहे. आश्विन शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हे दीप लावायचे असतात. सध्या विजेच्या वापराने रोषणाई केली जाते.
दीपावलीचे सामाजिक स्वरूप हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात सारखेच आहे. लोक आपली घरे स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून आणि फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सुशोभित करतात. अभ्यंग स्नान करून नवीन कपडे व मौल्यवान अंलकार घालून औक्षण करून घेतात. वाडवडिलांचे आशीर्वाद व एकमेकांना शुभेच्छा देतात. कारीट चाखून म्हणजे दृष्ट वृत्तीचा नाश करून दिवाळीचा फराळ खातात व एकमेकांना ही देतात. दीपावलीला वेगळी नावे असली तरी सण सगळीकडे उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी फराळ, रांगोळ्या, फटाके फोडणे, दिवाळी पहाट सारखे करमणुकीचे कार्यक्रम आखणे, एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व भेट वस्तू देणे इत्यादी प्रथा आहे.
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🙏🌹

शोभा वागळे
मुंबई.

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा