*कथाविश्व समूह प्रमुख… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या… लेखिका कवयित्री सौ.अचला धारप लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हरवलेली दिवाळी*
दिवाळी जवळ आली की होत असे गाजावाजा
पुर्वीसारखी नाही आता दिवाळीची खूप मजा.
चिवड्यासाठी पोहे वाळत पडायचे अंगणात
घराघरातून यायचा भाजाणी भाजल्याचा वास
अनरसे करण्यासाठी भिजवले जायचे तांदूळ
दिवाळीच्या फराळाची तयारी असायची खास!
शेणाने सारवून,काव लावून सजायचे अंगण
बाहेर पडायचा ठेवणीतला ठिपक्यांचा कागद
दहा आडवे,दहा उभे ठिपके मोजत
रांगोळी रेखाटली जायची अलगद.
किल्ल्यासाठी दगड,माती गोळा करत चालायची मुलांची लगबग
भराभर किल्ल्यावर पेरली जायची मेथी,मोहरी
किल्ल्यावर विराजमान व्हायचे शिवाजी आणि मावळे
बालगोपाळांची व्हायची मजेत दिवाळी साजरी
फटाके, चक्र, पाऊस वाळवले जायचे उन्हात
फटाक्यांबरोबर चक्र,भुईनळ्याच्या आतषबाजीची मजा
केपा, रोल वाजवले जायचे दुपारीच घरात
न वाजलेल्या फटाक्यांची दारु काढली जायची झाली जरी सजा.
वसुबारस,धनत्रयोदशी सारे व्हायचे साजरे
नरकचतुर्दशी साजरी व्हायची अभ्यंगस्नानाबरोबर चिरांट फोडून
ओवाळणीत साडी मिळाली की पाडवा व्हायचा गोड
भाऊबीजेची ओवाळणी दादाकडे हट्टाने मागून.
सौ.अचला धारप,रोहा.
Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃♀️🏃♂️
*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*
_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_
*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*
*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*
*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*
*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*
*_👩🏻🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*
*_👨🏻🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*
*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*
*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*
_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_
*📲9763824245 /9420196031*
*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*
*Advt link*
———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*