*दिल्लीचे मार्गदर्शक अमरावतीला येऊन विनामूल्य शिकवणार*
अमरावती :
स्पर्धा परीक्षेच्या जगतात संपूर्ण भारतात 23 राज्यात विनामूल्य काम करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत या दिवाळीत विद्यार्थ्यांसाठी अनोखी मेजवानी आणली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मुलांना या संधीचा फायदा घेता येईल. महाराष्ट्र शासनाचे व दिल्लीच्या सुप्रसिद्ध मालुका आयएएसचे तज्ञ मार्गदर्शक व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयोगाच्या मुलाखती देऊन आलेले श्री प्रशांत भाग्यवंत हे दिवाळीनिमित्त अमरावतीला आलेले असून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. 25 आँक्टोबरपासून दहा दिवस विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मिशन आय.ए.एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आय.ए.एस.च्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. मिशन आय.ए.एस व करिकर केअर अकादमीतर्फे लवकरच आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षभर विनामूल्य मार्गदर्शन तसेच त्यांना भोजन व निवास व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. यासाठी मुंबईचे उद्योजक श्री सुधीर चक्रे यांनी 30 मुलांचा भोजन व निवास खर्च तसेच प्रशिक्षणाचा खर्च उचलण्याचे मान्य केले आहे. त्याबद्दल आज सकाळी त्यांचा मालटेकडीवरील दिवाळी पहाट या कार्यक्रमात श्री दिनेश भाऊ बूब डॉ. श्रीकांत देशमुख आयएएस अधिकारी पल्लवी चिंचखेडे किरण बनसोड व मिशन आयएएसचे संचालक प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात म्हणून सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्राथमिक धडे देण्यात येणार आहेत. श्री प्रशांत भाग्यवंत हे तज्ञ मार्गदर्शक असून त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय केंद्राचे ते अधिकृत तज्ञ मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी या विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे.
प्रकाशनार्थ
प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती