You are currently viewing आली माझ्या घरी ही दिवाळी

आली माझ्या घरी ही दिवाळी

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या सौ.पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम ललित लेख..*…

*आली माझ्या घरी ही दिवाळी*..

*उजळू दे दीप दिवाळीचा*
*माझ्या संसार सागरी*
*जपते संस्कृती मांगल्याची*
*किती सुखावते अंतरी*….

गुलाबी थंडीची चाहूल आणि त्यात दिवाळीचे पाऊल…. शिवाय दुधात साखर म्हणजे हे खरं तर सुगीचे दिवस असतात घरात नवीन पिकांचे रास धनधान्य लक्ष्मीचा वास.. .अहाहा ! ! ! ! ! केवढी महान पर्वणी….आनंद द्विगुणित करणारी …नवोन्मेषाचे धुंद वारे या दिवाळीच्या सणाने किती सुखावून जातात…
नुकतीच पावसानेही पाठ फिरवली असल्याने सोनसळी राने किती मोहून टाकतात…. मग बळीराजा आनंदे भल्लरी गातो. निसर्गाने दिलेले हे सुबत्तेचे भरभरून दान मानवाला किती समृद्ध आणि आनंदी करते हो… अशी ही समृद्ध दिवाळी गरीबा पासून तर श्रीमंता पर्यंत आनंदाची पर्वणी घेऊन येते. अहो हा दिवाळसण म्हणजे साफ-सफाई देवळा सारखं लख्ख घर, रंगरंगोटी, सारी आवरा आवर,सारं कसं नीट नेटकं. टापटीप .इतर सणांपेक्षा कितीतरी वेगळा हा दिवाळ सण अगदी कानाकोपऱा उजळून निघतो… म्हणूनच म्हटले जाते …..

*सणांमध्ये सण*
*दिवाळी अगोचर*
*नाही ठेवी कुठे*
*सांदी कोपऱ्याला केर*”…..

‌‌ अशी ही सारी जय्यत तयारी करून दारी सुंदर रांगोळीची आरास, अंगणात आकाश कंदील, पणत्यांच्या तेवणाऱ्या सुंदर ओळी ,झगमग रोषणाई, जणू स्वर्गच भूवरी अवतरलाय…. अशी ही आलेली माझ्या घरची दिवाळी जणू सौख्याची अत्तर कुपीच घेऊन आली आहे.

*सारी लखलख रोषणाई*
*धनलक्ष्मी ही समृद्धीची*
*तिला उटण्याचे स्नान*
*तेजप्रभा ही पावित्र्याची*…

नवचैतन्याची दिवाळी पहाट, अंगणाची शोभा ,पहाटेचे सुगंधित उटण्याचे स्नान, अशा नवतेजाने पहाट उजळून जाते आणि मना प्रसन्न ठेवते….
अशातच लेक माहेराला येते.

*जसा चंद्र दुधारी नभात*
*तशी लेक लाडकी माहेरात*
*भाऊ बहीण प्रेमाचा गोडवा*
*ओवाळणीच्या तबकात*

किती कौतुक कौतुक….
नातवंडाचा अवतीभोवती गलका… साऱ्या घरभर लाडू चिवड्याचा घमघमाट. …प्रत्येक जण वेगळ्याच आनंदात….. सगळं कसं चैतन्याचं वातावरण… सारा आनंदी आनंदच…..
घरची गृहिणी सुद्धा आवर्जून अगदी लक्ष्मी सारखी दागदागिने नवी साडी नेसून अशी सजते जणू साक्षात चालती बोलती रूपलक्ष्मीच भासते..
गाय वासरा पुजते.. घास पुरणपोळीचा प्रेमाने भरविते…मुले लेकरे नवे कपडे घालून नटतात. गोड धोडअन्नाचा ्स्वाद ताटात…. ही वातावरण निर्मिती दिवाळीची केवढी गोड अनुभूती….

मुलांना तर स्वर्ग दोन बोटेच उरतो. नवे कपडे ,फटाके, गोड पक्वान्न नि सारे मोकळे आकाश… लखलखता प्रकाश.. मनसोक्त आनंद…
*अशा दिवाळी सणा*
*मुलाबाळा आनंदा उधाण*
*सुखाचे उधळीत मोती*
*हरेका केवढे समाधान*….

आली माझ्या घरी ही दिवाळी पर्वणी सुखाची घेऊन
वाट पाहते बंधूची
ताटी निरंजन सजवून…
नात्यातील प्रेम वृद्धींगत करणारी ही दिवाळी संस्कृतीची शान आहे. भाऊ बहिणीचे रक्ताचं नातं राखीच्या आणि दिवाळीच्या सणाला चार चांद लावून जातं….
आपली संस्कृती खरेच महान आहे .थोरामोठ्यांचा मानसन्मान हीच पिढ्यान् पिढ्यांची शान आहे!!!!!
प्रेमाचं प्रतीक असणारा पाडवा,

*काय घालू सखे ओवाळणी*
*तू माझ्या काळीज कोंदणी*
*घरात हसरे तारे*
*त्यातील तू शुक्र चांदणी*..

दिवाळीचा येणारा सुखद सण पाडवा …..पती-पत्नीच्या नात्याला आणितो गोडवा…
आपल्या अर्धांगिनी वर भरभरून प्रेम करणाऱा पतीदेव हे ऋणानुबंध जोपासत आनंद द्विगुणित करतात… आणि जगण्याला नवचैतन्य देतात.
राघु मैनेच्या एकच विचारी
कुळ गोत्र आपले उद्धारी..
आली माझ्या घरी ही दिवाळी पै पाहुण्यांची सरबताई . भेटीगाठी च्या आनंदाने मना केवढी अपूर्वाई. सुखदुःखाच्या फुलांनी नात्यांचा सुंदर गोफ विणून, आनंदाचं शिंपण करत आनंदाचा साठा लुटत , घराला घरपण देऊन , माणुसकीची ज्योत लावुन हा दिवाळसण ओटी सुखाची भरतो!!!!!
इवलीशी पणती गरीबाची झोपडी सुद्धा लख्ख प्रकाशून टाकतो.. दाहीदिशा उजळून निघतात. आनंदाचे हे पाच दिवस किती प्रसन्न वाटतात… निखळ आनंदाने मुखमंडल प्रकाशून जाते. अशी माझ्या घरची ही दिवाळी मला जगण्यास नवसंजीवन देते. माणसांची ये-जा झाल्याने कुठेतरी प्रेम धागा जोडला जातो. आणि मग जीवन बागेत सहवासासाठी मकरंद रुंजी घालू लागतात. आणि ह्याच माणूस जन्माचं सोनं झाल्यासारखं वाटतं….
सदाचाराच्या सुगंधाने
आनंदाच्या पर्वणीला नसेल तोड…

*उजळू दे दीप दिवाळीचा*
*आता चंद्रमौळी झोपडीत*
*चिमुकल्या पणतीच्या प्रकाशी*
*नाती प्रेमभावाची जोडीत*….

*लेखिका ….सौ पुष्पा सदाकाळ* *भोसरी*पुणे* 9011659747.

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

.

प्रतिक्रिया व्यक्त करा