*नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे आयोजन*
पांढरकर नगर, चिंचवड :
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित “दिवाळीसांज” या कार्यक्रमात आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसुबारसेच्या निमित्ताने सवत्स धेनू प्रतिमेचे पूजन करून आणि पणत्या उजळून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. अशोक कोठारी होते. बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक मा. अब्दुल्ला खान यांची प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेंद्र घावटे, माजी प्राचार्य मा. परशराम शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपतराव शिंदे यांनी केले.
यानिमित्ताने स्थानिक कवी कवयित्री यांचा स्वरचित भक्ती कविता आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये ज्येष्ठ कवी मा. बाबू डिसूजा, जयश्री श्रीखंडे, शामला पंडित , प्रा. नरहरी वाघ, मनीषा पाटील, आनंदराव मुळुक, कांचन नेवे, शामराव सरकाळे, सुप्रिया लिमये, रामदास हिंगे, योगिता कोठेकर आदिंनी आपल्या भक्तीरचना सादर करून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
मा. माधुरी ओक यांनी आपल्या नवचैतन्य संघाच्या सख्यांसह भारूड सादर केले. याप्रसंगी मा. श्रीकांत चौगुले, रघुनाथ पाटील, चंद्रकांत धस, कैलास भैरट, माधुरी डिसोजा, विविध मान्यवर साहित्यिक तसेच साहित्य रसिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन माधुरी विधाटे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, अश्विनी कुलकर्णी, अरविंद वाडकर, शरद काणेकर, उज्ज्वला केळकर यांनी केले. आभार प्रदर्शन अनिकेत गुहे यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप दिवाळीच्या फराळाने करण्यात आला.