You are currently viewing विमानतळा प्रमाणे शासकीय मेडिकल कॉलेजचा दिखाऊपणा नको – सुरेश सावंत

विमानतळा प्रमाणे शासकीय मेडिकल कॉलेजचा दिखाऊपणा नको – सुरेश सावंत

कणकवली

चिपी विमानतळावर गणपतीला एक भाड्याचे विमान उतरून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणवासीयांची दिशाभूल केली होती. अद्याप विमानसेवा सुरु झालेले नाही.आता शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली म्हणून पेढे वाटप फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. मात्र ते वास्तवात मेडिकल कॉलेज होईल का? अन्यथा जनतेची फसवणूक आणखी एक प्रयोग शिवसेना करत असल्याचे उघड होईल असा उपरोधिक टोला भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी लगावला आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पालकमंत्र्यांनी आतापर्यंत अनेक खोट्या घोषणा केलेला आहे. त्यामध्ये हटाव मोहिम असो, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,असं म्हणून सांगितले पण अद्याप कर्जमाफी झाली नाही. सातत्याने खोटे बोलण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहेत. आता सिंधुदुर्गातील शिवसेना ही फसवी शिवसेना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. जिल्ह्यात खड्डेमय रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न व अन्य प्रश्नांबाबत सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा आरोप सुरेश सावंत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा