सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय व वामनराव महाडिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा
भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त तळेरे हायस्कूलमध्ये ग्रंथप्रदर्शन
सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच याप्रसंगी विद्यालयात ग्रंथप्रदर्शनही मांडण्यात आले होते . या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर यांनी भूषविले .तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक रमाकांत उर्फ दादा वरूणकर लाभले. यावेळी सुनील तळेकर चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश भाऊ तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर , वाचनालयाचे माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे, उपाध्यक्ष राजू वळंजू , कार्यकारी सदस्य हेमंत महाडिक, शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर ,डॉ. मनिषा नारकर , माॕडेल काॕलेजचे प्राध्यापक दळवी , विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर , श्रावणी कॉम्प्युटरचे श्रावणी मदभावे , प्रमोद कोयंडे , शशांक तळेकर , सतीश मदभावे, विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख सहायक शिक्षिका डी. सी. तळेकर, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, एन. बी. तडवी, पी. एम. पाटील, पी. एन. काणेकर, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, ए.पी. कोकरे, एन.पी. गावठे, व्ही.डी. टाकळे , ए. बी. तांबे, एस. यु. सुर्वे , एस. एन. जाधव , शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर ,विद्यार्थी , पालक आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने यावेळी स्वागत करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले , वाचनाने मनुष्य समृद्ध होतो, प्रगल्भ होतो आणि वाचनाविषयीचे महत्त्वही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणातून विनय पावसकर म्हणाले , वाचनाची स्वतःमध्ये आवड निर्माण करून नवनवीन पुस्तके विद्यार्थ्यांनी नजरेखालून घालणे , वाचणे महत्त्वाचे आहे . यामुळे आपल्या विचार-आचार यामध्ये सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसतील. सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेऊन वाचनाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले . यावेळी व्यासपीठावरील
डाॕ. मनिषा नारकर , प्रमोद कोयंडे , संजय पाताडे , श्रावणी मदभावे , प्रमुख पाहुणे दादा वरूणकर ,यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. हेमंत महाडीक , सूत्रसंचालन सहायक शिक्षिका डी. सी. तळेकर , तर आभार एस. यु. सुर्वे यांनी मानले
भारतरत्न डाॕ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन विद्यालयाच्या डाॕ. एम.डी. सांस्कृतिक भवनात सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय व वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने निवडक व वाचनीय पुस्तकांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते . सलग तीन दिवस असलेल्या या प्रदर्शनास परिसरातील अनेक मान्यवर व्यक्ती , विद्यार्थी , पालक , ग्रामस्थनीं भेट देऊन वाचनाचा आनंद लुटला
मार्गदर्शन करताना सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर , सोबत इतर मान्यवर