You are currently viewing दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रामार्फत दिवाळी फराळ आणि आकाश कंदील विक्री

दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रामार्फत दिवाळी फराळ आणि आकाश कंदील विक्री

सिंधुदुर्ग

दिव्यांग मुलातील कौशल्य विकसित व्हावे यासाठी साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र मार्फत दिव्यांग मुलांच्या साह्याने दिवाळी फराळ व आकाश कंदील बनवण्यात आले आहेत. येथील ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रात दिवाळी फराळ आणि आकाश कंदील विक्री ठेवण्यात आले आहेत. संस्थेच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांच्या सहकार्यातून या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात . जेणेकरून दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होईल. यंदा दिवाळी फराळ आणि आकाश कंदील बनवण्यात आले आहेत दिव्यांग मुलांच्या मदतीने फराळ आणि आकाश कंदील बनवण्यात आले आहेत. केंद्राच्या कर्मचारी प्रियांका कडगावकर ,द्रोपदी राऊळ, विदिशा सावंत यांची मदतही यासाठी घेण्यात आली आहे. दिव्यांगानी बनवलेले फराळ आणि आकाश कंदील खरेदी करून दिव्यांगांच्या कौशल्याला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा