*साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे पहिले जागतिक साकव्य संमेलन ३० ऑक्टोबर रोजी नाशिक नगरीत*
*देश विदेशातील साहित्यिक होणार सहभागी*
जागतिक साहित्य कला व व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे पहिले साकव्य साहित्य संमेलन रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी (साकव्य नगरी), भावबंधन मंगल कार्यालय, नाशिक येथे पार पडणार आहे. एकदिवसीय साकव्य संमेलनात कविकट्टा, गझलकट्टा सह कला आणि व्यक्तित्वाची होणार ओळख होणार असून रविवारी सकाळी ७.०० वाजता शिवमंदिर ते संमेलन स्थळी “ग्रंथदिंडीने” संमेलनाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
संमेलन स्थळी सकाळी ७.४५ वा.मान्यवरांच्या हस्ते “ध्वजारोहण” होऊन मोठ्या थाटामाटात संमेलनास सुरुवात होईल. सकाळी ९.०० वा. अभिनेते मा.दीपक करंजीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पांडुरंगजी कुलकर्णी (अध्यक्ष साकव्य) हे असतील. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री, कवयित्री मेघना साने करतील. सकाळी १०.३० वा. “पुस्तक प्रकाशन आणि कलादालन” उद्घाटन होईल. या कार्यक्रमासाठी मा.श्री.अरविंद शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.४५ ते ११.४५ “कला आणि व्यक्तित्व ओळख” होणार असून यात कुंभार(शिल्प), त्वरित रेखाचित्र रेखाटने, योगासन, जलतरंग, क्लोरोनेटेड वादन, स्वगत आदी कार्यक्रम होतील. य कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते मा.सी.एल.कुलकर्णी व अभिनेते डॉ.राजेश आहेर प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सविता कुलकर्णी व सौ.भारती देव करतील. त्यानंतर “गझलकट्टा” हा गझलेचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम सादर होणार, असून या कार्यक्रमासाठी गझलकार श्री.संजय गोरडे हे प्रमुख पाहुणे असतील तर सूत्रसंचालन श्री.राज शेळके करतील.
साकव्य संमेलनाच्या दुपारच्या स्नेहभोजनानंतरच्या सत्रात “कविकट्टा” हा बहारदार कार्यक्रम होणार असून मसाप, पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष कवी-लेखक मा.श्री.राजन लाखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर अध्यक्षस्थानी श्रीम.अलका कुलकर्णी (साकव्य कार्य.सदस्या) असतील.कविकट्ट्याचे सूत्रसंचालन श्रीम.राखी जोशी व श्रीम.संयुक्ता कुलकर्णी करतील. सायंकाळी ५.३० ते ६.१५ वाजता मा.श्री पांडुरंगजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप सोहळा पार पडणार असून समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास को.ऑप.बँक, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. विश्वास ठाकूर उपस्थित असतील.
नाशिकच्या साकव्य नगरीत पार पडणाऱ्या जागतिक साकव्य विकास मंचच्या संमेलनाला सर्व साकव्य सदस्यांनी उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवावी असे आवाहन साकव्य अध्यक्ष श्री.पांडुरंग कुलकर्णी व कार्यकारिणी सदस्य डॉ.श्री.चिदानंद फाळके, श्री.चंद्रशेखर शुक्ल, श्री.हरिभाऊ कुलकर्णी, श्रीम.प्रियंका कुलकर्णी, श्रीम.अलका कुलकर्णी आणि सुकाणू समितीने केले आहे. संमेलन स्थळ: (साकव्य नगरी) भावबंधन मंगल कार्यालय, मखमलाबाद रोड, हनुमानवाडी, नाशिक ४२२००३.
संमेलन संबंधी माहितीसाठी संपर्क:- मा.श्री.पांडुरंग कुलकर्णी 7769055883 / 9321218324, डॉ.चिदानंद फाळके 9923376795, श्री.चंद्रशेखर शुक्ल 9892882012.
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*
*Advt link*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*