You are currently viewing वेंगुर्लेत एसटी बस झाडाला आदळून दुकानाला धडकल्याने अपघात…

वेंगुर्लेत एसटी बस झाडाला आदळून दुकानाला धडकल्याने अपघात…

अंदाजे पन्नास हजारचे नुकसान; सुदैवाने कोणीही जखमी नाही…

वेंगुर्ले

एसटी बसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे एसटी थेट झाडावर व बाजूला असलेल्या प्रसाद प्रभू झांट्ये यांच्या दुकानावर आदळल्यामुळे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आजगाव मराठी शाळा येथे घडला.
याबाबत अधिक माहित अशी की, सावंतवाडी-शिरोडा एसटी बसचे चालक एस. एल. राणे आणि वाहक पी. पी. मेस्त्री हे आपल्या ताब्यातील सावंतवाडी आगाराची एसटी बस ही सावंतवाडीहून शिरोडा येथे घेऊन येत होते. आजगांव मराठी शाळेनजीक प्रसाद प्रभू झांट्ये यांच्या दुकानाकडे एसटी बस आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या विरूद्ध दिशेने असलेल्या, दुकानासमोरील आंब्याच्या झाडाला धडकली. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. ही घटना मंगळवार रात्री ९ च्या दरम्यान घडली असून भरधाव वेगाने जात असलेल्या एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेत झांट्ये यांचे सिमेंट कौले आणि गोडावूनचे छप्पर असे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आज सकाळी पोलिसांनी पंचनामा करून ही एसटी बाजूला करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास शिरोडा पोलीस हेडकॉन्स्टेबल दळवी करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा