साद फाउंडेशन सिंधुदुर्ग चे आयोजन, रविवार 23 ऑक्टोबर रोजी,स.10.30 वा.
जिल्ह्यातील विद्यार्थी पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
MPSC चे शनी-रवी मोफत डेमो लेक्चर
युनिकच्या यशस्वी विद्यार्थ्यांसह, युनिक पनवेल चे मा. राजेंद्र इंगळे प्रमुख उपस्थिती
कणकवली.
युनिक अकॅडमी कणकवली च्या सर्व यशवंतांचा स्नेहमेळावा आणि दीपोत्सव रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा.साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने युनिक अकॅडमी कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धापरीक्षेतून अभ्यास ते अधिकारी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या युनिक अकॅडमी कणकवली च्या यशवंतांचा विद्यार्थी दशेत असताना सुरु केलेला अभ्यास, परीक्षा आणि प्रशासनात आल्यानंतरचा अनुभव असा संपूर्ण प्रवास जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांना जाणून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व यशवंतांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भावी अधिकारी निर्माण होण्यासाठी असलेला दृष्टिकोन अशा विविध विषयांवर आधारीत स्नेहमेळावा आणि दीपोत्सव आयोजित करण्याचा संकल्प ‘साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग’ या संस्थेने केला आहे. यासाठी द युनिक पनवेल चे प्रमुख राजेंद्र इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून युनिक चे यशस्वी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाची अध्यक्षता युनिक अकॅडमी कणकवली चे संचालक सचिन कोर्लेकर करणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि युनिक अकॅडमी कणकवली यांच्या मार्फत करण्यात आले आहे, अधिक माहितीसाठी 9969658458/9589414974 या नंबर वर संपर्क साधावा.