You are currently viewing उपजिल्हा रूग्णालयाला किरण सी आर्म एक्स रे मशीन द्या

उपजिल्हा रूग्णालयाला किरण सी आर्म एक्स रे मशीन द्या

काँग्रेसच्या राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग (हाडाची शस्त्रक्रिया) करण्यासाठी आधुनिक पद्धतीची रुग्णांना दिलासा देणारी मशीन व त्यावर लागणारी उपकरणे यासाठी सुमारे 11 लाख 50 हजार रुपये किमतीची किरण सी आर्म एक्स रे मशीन जिल्हा नियोजन मार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधी प्राप्त करून द्यावा अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा