देवगड :
आज पासून आमदार नितेश राणे हे देवगड तालुकाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात जनता व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, विकास कामाबाबत चर्चा, संघटनात्मक बांधणी आदी कार्यक्रमात सहभागी होणार आहे. विकास कामांची उद्घाटने आणि नवनिर्माचित सरपंच, सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते उपस्थित राहून सत्कार करणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता आमदार नितेश राणे देवगड येथील हॉटेल सुवर्ण येथे पोहोचतील त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी हॉटेल सुवर्णा येथे थांबतील त्यानंतर ११ वाजता पडवणे येथे गाव भेट करून तेथील जनतेशी संवाद साधतील. दुपारी १२.०० वाजता विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमदार नितेश राणे उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २.०० वाजता मोंड ग्रामपंचायत येथे शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर ३.०० वाजता मळेगाव ग्रामपंचायत येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे सत्कार करण्यासाठी उपस्थित राहतील. यादरम्यान जनतेच्या गाठीभेटी घेऊन संवाद ते सांधणार आहेत.