You are currently viewing श्रद्धा—अंधश्रद्धा.

श्रद्धा—अंधश्रद्धा.

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*श्रद्धा—अंधश्रद्धा.*

डॉक्टर अनिल अवचट त्यांच्या *धार्मिक* या पुस्तकात म्हणतात,” की माझ्यापुरता मी श्रद्धेविषयीचा निकष ठरवला आहे. जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते, धर्म, जात, देश या पलीकडे जाऊन, माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवते, एवढेच नव्हे तर निसर्गातल्या प्राणी, वनस्पती या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते ती आवश्यक श्रद्धा. आणि जी माणसाला संकुचित बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा.

कुठल्याही श्रद्धेचा डोळस विचार करणे, त्यातले योग्य अयोग्य परखडपणे तपासणे, कालविसंगत गोष्टींचा त्याग करणे आणि विचारवंतांना त्यांची भूमिका मांडण्याची मोकळीक देणे हेही आवश्यक आहे. आणि तसे घडले नाही तर मात्र केवळ आग्रह धरणे ही अंधश्रद्धाच ठरते.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा तशी धूसर आहे. ज्या श्रद्धेत सारासार विचार नसेल केवळ गतानुगतीकता असेल तर ती मात्र अंधश्रद्धाच आहे.

आपण कोणत्या ना कोणत्या व्यवस्थेचे घटक आहोत अशी भावना जगण्यास सुरक्षितता देते. माणूस कोणत्यातरी प्रस्थापित धर्मास चिकटून आपली धार्मिक गरजही भागवत असतो. पण आपल्या धार्मिक संकल्पनांना शास्त्रीय आधार आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टीने तपासून त्याचे योग्य पालन करणे ही सकारात्मक श्रद्धा आहे.

देवा तुझे किती सुंदर आकाश।
सुंदर प्रकाश सूर्य देतो ।।
ही लहानपणापासून वाचत आलेली सुरेख कविता. ईश्वर सर्वत्र आहे या वचना बरोबरच आपण वाढलो. जसे वाढत गेलो तसे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या आपल्या कल्पनांचा विस्तार होत गेला असेल किंवा त्यास फाटेही फुटत गेले असतील, परंतु एका सर्वश्रेष्ठ शक्तीच्या अस्तित्वाला अजिबात न मानण्या इतकी वृत्ती समाजात अभावानेच आढळते.

समाजात आस्तिक आणि नास्तिक असे दोन गटही आहेत. पण माझ्या मते कुठल्याही मतप्रवाहाचा अतिरेक हे सामाजिक दृष्ट्या नक्कीच घातक आहे.

श्रद्धा या शब्दाची सांगड फक्त ईश्वर, धर्म, परंपरा, संस्कृती याच संकल्पनांशी बांधलेली नसावी असे मला वाटते. आई वडील, गुरुजन, शेजारी, आपले सवंगडी, आपले काम कार्य, नेमून दिलेला अभ्यास, इतकेच नव्हे तर आपण जे अन्न खातो त्यावरही श्रद्धा असणे हे महत्त्वाचे मानले जाते. जेवताना आपण म्हणतो की,
उदरभरण नोहे। जाणिजे यज्ञ कर्म।।
या स्तोत्रातून एक चांगला संदेश दिला आहे की, आपल्या ताटातलं अन्न हे भूमी मातेचे वरदान आहे. त्याचा आदर ठेवा. ते उतू नका. मातू नका.हा विचार श्रद्धायुक्त आहे.
माझी आजी म्हणायची,”तुला वैद्याने जे औषध दिले आहे ते तू श्रद्धेने घेशील तरच तुझी व्याधी बरी होईल.”
भावनिक असली तरी ही तथ्यपूर्ण श्रद्धा आहे हे नक्कीच.

तीन दगडफोड्यांची एक कथा मला आठवते.
एकाला विचारले,” तू काय करत आहेस?”
तो म्हणाला,” मी दगड फोडतोय.”
दुसऱ्याला विचारले,” तू काय करत आहेस?”
तो म्हणाला,” मी पोटापाण्यासाठी हे काम करत आहे” तिसऱ्याला विचारले, ” तू काय करत आहेस?”
तेव्हां तो म्हणाला,” मी एक सुंदर मंदिर बांधायचा प्रयत्न करत आहे”
यावरून आपणास तिसऱ्याची कामावरची श्रद्धा जाणवते. जी सकारात्मक आहे. रचनात्मक उद्दिष्ट असलेली म्हणून ही श्रद्धा ऊर्जा देणारी, सक्षम आहे.

मात्र आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धाच म्हणावे. अंधश्रद्धे मध्ये विविध प्रकार आहेत. काळी जादू, तंत्र मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, तसेच भूत प्रेत पिशाच या संबंधित अंधविश्वास अफवा पसरणे व कृती करणे आणि कृतींचा विपरीत परिणाम दिसून येणे ही अंधश्रद्धा आहे. आजारी माणसाला तज्ञ डॉक्टर कडे न नेता मांत्रिक उपचार करणे, भस्म अंगारे लावणे, त्याला भूतबाधा झाली आहे असे मानणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. पाळी आलेल्या बाईला दूर ठेवणे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. तिला देवळात जाण्यास मनाई असावी हा मूर्ख कल्पनांचा बाजार आहे.मात्र या काळात स्त्रीला विश्रांतीची गरज असते या भावनेने तिला काही करू न देणे हा त्यातला समंजस वैज्ञानिकतेचा भाग आहे. तसेच तीन तिघाडा काम बिघाडा, मांजर आडवं गेलं ,गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो असे समजणे, पितृपक्षात खरेदी करू नये, शुभकार्य करू नये अशा अनेक कल्पना मनाशी बाळगणे, हा केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे. या कल्पनांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. कधी कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला हा योगायोग असू शकतो. पण अशा कल्पनांवर आपले जीवन बेतणे हा मात्र अंधश्रद्धेचा भाग आहे.

मी हे सारं लिहीत असताना माझ्या मनात एक प्रातिनिधिक स्वरूपात सामान्य माणूस आहे. जो देवाला मानतो, मंदिरात जातो, दगडाच्या मूर्ती समोर मनोभावे हात जोडतो, नामस्मरण करतो ,”देवा मला वाचव रे!” असेही म्हणतो, नवस करतो, न खाणाऱ्या देवालाही नैवेद्य दाखवतो, “शुभंकरोती कल्याणम् ” म्हणतो, सांजवेळी दिवा लावतो. पण या सर्व छोट्या छोट्या कृतीतून तो त्याच्या पुरतं जगण्यासाठीचं बळ गोळा करत असतो. ऊर्जा मिळवत असतो. तो त्याच्या आहारी गेलेला नसतो. म्हणून या श्रद्धेस मी आवश्यक घटक मानेन. आणि अट्टाहासाने, दुराग्रहाने, पीडा सोसून, अतिरेकीपणाने केलेल्या रिती रिवाजात जो स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकतो तेव्हां मात्र मात्र त्यास नक्कीच अंधश्रद्धा म्हणावे लागेल.

तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची समंजस बुद्धिवादी लोकांनी शास्त्रीय आणि वैज्ञानिक निकषावर योग्य ती सांगड घालावी हीच अपेक्षा.

राधिका भांडारकर

Advertisement

 

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा