You are currently viewing बांदा येथे डॉ. कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

बांदा येथे डॉ. कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

बांदा:

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात विदयार्थी दिवस आणि सोबतच महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ. कलाम यांना जगभरातून आदरांजली वाहिली जाते.

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथेही डॉ कलाम यांची जयंती उत्साहात साजरी केली गेली. ग्रंथ प्रदर्शना सोबत प्रशालेचे ग्रंथपाल श्री संतोष परब यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथ समीक्षण स्पर्धेस’ विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग लाभला. आपल्याला आवडलेल्या ग्रंथाचे समीक्षण भाषण स्वरूपात सादर करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्राचार्या सौ. एम. एम. सावंत यांनी चौफेर वाचन करून ज्ञानी बना असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. कलाम यांचे जीवनचरित्र प्रमुख वक्ते श्री सुर्यकांत सांगेलकर यांनी थोडक्यात मांडले आणि मोबाईल पासून दूर जात उत्तम पुस्तकांच्या वाचनाने जीवन समृद्ध बनवा असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. पुस्तक समीक्षण स्पर्धेत कु. प्रणव नाईक, सिध्दी तळगावकर, तन्वी वझे, आकांक्षा सावंत आणि सिमंतीनी वालावलकर या विद्यार्थ्यांनी गुणानूक्रमांक प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सावळ मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुजा गावडे, रसिका भिसे यांचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी उपप्राचार्य श्री पी. यू. देसाई, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. व्ही. नाईक, इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा