इमारत जळून खाक; सुमारे पावणे तीन लाखाचे नुकसान…
सावंतवाडी
चराठा-गावठाणवाडी येथे बांदेकर ब्रदर्सच्या लाडू फारसाण बनवण्याच्या भट्टीत तेलाच्या कडईने अचानक पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात भट्टीसह इमारत जळून खाक झाली असून सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
बेकरीच्या मालक राधिका बाळकृष्ण बांदेकर यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी कोरोनामुळे पतीचे निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत त्यांनी आत्ताच या व्यवसायात जम बसवायला सुरुवात केली होती. त्यामुळे या घटनेमुळे त्यांना पाठोपाठ धक्काच बसला आहे.