You are currently viewing गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

ॲड. अशपाक शेख यांचे यशस्वी युक्तिवाद

दिनांक 26/ 9/ 2021 रोजी रात्री 12.15 वाजता पोलीस वसाहत येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये गणपती उत्सवानिमित्त सभा मंडपात बसलेले असताना एक महिला सभामंडपात वाचवा, वाचवा, मदत करा असे ओरडत आली होती. त्यानंतर यातील साक्षीदार व इतर साथीदार काहीतरी घडले आहे का पाहण्यासाठी त्यांचे बिल्डिंग मधील रूम नंबर 4 येथे गेले असता आरोपी साहिल शेख हे ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना दिसले म्हणून आरोपी यांचेवर भा.द.वी. कलम ३०९ प्रमाणे गुन्ह्याचा ठपका ठेवलेला होता.

सदर कामी 6 साक्षीदारांची कसोसून तपासणी करण्यात आली. आरोपीचे विरुद्ध सबळ पुरावा आला नाही. तसेच सदर केसमधील आरडाओरडा करणाऱ्या महिलेचे टिपण अथवा तिचेकडे चौकशी केलेली नसल्याने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आलेला नाही म्हणून मे. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब ओरोस श्री. ए. एम. फडतरे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा