वाढदिवस अभिष्टचिंतन…
कोकणातील उभारत नेतृत्व आणि नारायण राणे कुटुंबीयांच्या घरातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे युवा नेता विशाल परब…!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात अनेक युवकांनी नारायण राणे यांचे नेतृत्व मान्य करत नारायण राणे समर्थक म्हणून राहण्यात धन्यता मानली त्यापैकीच एक म्हणजे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात जन्मलेल परंतु सावंतवाडी मध्ये नावारूपास आलेले नाव विशाल परब…! विशाल परब यांनी राजकारणाचे धडे त्यांचे वडील प्रभाकर परब यांच्याकडूनच घेतले. वडिलांप्रमाणेच विशाल परब यांनी देखील राजकारणात आपले नाव कमावले. राजकारणात प्रवेश केल्यापासून विशाल परब हे नारायण राणे कुटुंबीयांचा एक भाग असल्यासारखे आहेत. माजी खासदार निलेश राणे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे विशाल परब हे युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर विशाल परब यांनीन उद्योग व्यवसायातही मोठी झेप घेतली आहे. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी माणगाव खोऱ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चार दिवस विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व असा तिहेरी संगम असलेले, दीनदुबळ्या गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणजे युवा नेते विशाल परब होय.
आजच्या 21 व्या शतकात हेवा वाटावा असे कार्य करणारे कार्यसम्राट युवा नेते विशाल परब यांचा आज 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस…! विशाल परब यांची दातृत्वाची आणि कर्तृत्वाची वाटचाल दिवसेंदिवस अशीच फुलत राहो आणि भावी वाटचाल याहूनही सुखद होवो अशा त्यांना संवाद मिडियाकडून शुभेच्छा…