*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल प्रशासक… श्रीशब्द सह समन्वयक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम भावगीत*
*माझ्या मन मंदिरात*
मनमंदिरात माझ्या सखे तुझे हे मोकळे आकाश
माळुनी सुगंध ये भेटीस अजुनी आहे अवकाश !!धृ!!
गालावरीच्या बटांना प्रिये तू जरा सार बाजूला
लाजुनी गालांनी पहा कसा तो गुलाब माळला
नको चालूस लगबगीने मी रोखुनी धरला श्वास
माळुनी सुगंध ये भेटीस अजुनी आहे अवकाश !!१!!
लज्जेच्या पाकळ्या त्या पापण्या वरुनी सांडल्या
गंधाळल्या वाटेवरी तुझ्या मी पायघड्या घातल्या
नाजूक कोमल पुष्पदल तुडवीत तू ये सावकाश
माळुनी सुगंध ये भेटीस अजुनी आहे अवकाश !!२!!
गार वारा झोंबता अंगास, उभा अंगभरी शहारा
भेटीला आतुर लाटांच्या बाहु पसरुनी किनारा
तांबूस किरणे रविची पाहतील सोहळा हा खास
माळुनी सुगंध ये भेटीस अजुनी आहे अवकाश !!३!!
©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६