You are currently viewing ऑल इंडिया शूटिंग चॅम्पिअनशिप (रायफल) स्पर्धेमध्ये वेंगुर्ले ची कु. सानिया आंगचेकर हीचा डंका…

ऑल इंडिया शूटिंग चॅम्पिअनशिप (रायफल) स्पर्धेमध्ये वेंगुर्ले ची कु. सानिया आंगचेकर हीचा डंका…

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे साठी निवड : सर्व स्तरातून कौतुक

वेंगुर्ले

पश्चिम बंगाल येथील आसनसोल येथे १० ऑक्टो. ते १४ ऑक्टो. या कालावधीत संपन्न झालेल्या ३१व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा (रायफल) या स्पर्धेमध्ये वेंगुर्ले गावाची सुकन्या कुमारी सानिया सुदेश आंगचेकर, वेंगुर्ले ( एस. पी. के कॉलेज सावंतवाडी ) हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत युथ व जुनियर या वयोगटात सहभाग घेऊन ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धे साठी आपले स्थान पक्के केले. तसेच १८ वर्ष व २१वर्ष वयोगटामध्ये तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पश्चिम बंगाल येथील हि स्पर्धा १० मीटर पीप साईट प्रकारात घेण्यात आली. यामध्ये १२ राज्यांमधून १२४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून सानिया हिने यश संपादन केले आहे.
यापूर्वी सानिया हिने डेरवण युथ गेम्स २०२० मध्ये ३१५/४०० स्कोअर करून राज्यस्तरीय ओपन साईड वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविले होते. तसेच महाराष्ट्र एअर आणि फायरआर्म राज्यस्तरीय ,मुंबई स्पध्येमध्ये २०२० मध्ये ३७४/४०० स्कोअर करून प्री नॅशनल साठी तिची निवड झाली होती.
दरम्यान सानिया हि वेंगुर्ले येथील उपरकर शूटिंग रेंज वर नेमबाजीचा सराव करत असून तिला प्रशिक्षक कांचन उपरकर याचे प्रशिक्षण लाभले तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले .सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सानिया हिचे विशेष कौतुक केले तसेच वेंगुर्ला नगरपरिषद ने चालू केलेल्या एकलव्य शूटिंग रेंज , वेंगुर्ला या रेंज वर सध्या ती आपला सराव करत असून वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगसेवक, तसेच मुख्याधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. या सर्वांनी पुढील राष्ट्रीय स्पर्धे साठी तिला शुभेच्या दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा