You are currently viewing यंञमाग कामगारांना किमान वेतनाची पुनर्रचना करण्याची मागणी

यंञमाग कामगारांना किमान वेतनाची पुनर्रचना करण्याची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी

यंञमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतनाची पुनर्रचना करावी , स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ,यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी येथे आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले.तसेच या मागण्यांबाबत शासनाने तात्काळ कार्यवाही अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.सदरचे निवेदन नायब तहसिलदार संजय काटकर यांनी स्विकारले.

शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणून यंञमाग उद्योगाकडे पाहिले जाते.परंतू ,या उद्योगातील कामगारांना शासनाच्या कोणत्याच सुविधा नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.तसेच १२ तास काम करुनही त्यांना आरोग्याची सुविधा मिळत नसल्याने अनेक कामगार हलाखीत जीवन जगत आहेत.या उद्योगाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो.असे असूनही या कामगारांना प्राॅव्हीडंड फंड ,ई.एस.आय.,ग्रॅज्युएटी ,
साप्ताहिक सुटी , ८ तास काम , हजेरी कार्ड ,पगारपञक अशा सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करुनही या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.याच अनुषंगाने कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजी येथे आज
यंञमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतनाची पुनर्रचना करावी , स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ,यासह विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार संजय काटकर यांनी निवेदन स्विकारले.यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी यंञमाग उद्योगातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करुन त्याची तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ,असा इशारा दिला.
या शिष्टमंडळात जेष्ठ कामगार नेते शामराव कुलकर्णी , धोंडीबा कुंभार , राजेंद्र निकम , हणमंत लोहार , सुनील बारवाडे , प्रदीप साहू , बंडोपंत सातपुते , रियाज जमादार ,
महेश लोहार ,शिवानंद पाटील ,संजय हेब्बाळकर ,मुबारक हाकिम ,विष्णू चव्हाण ,रंगराव बोंद्रे,दादू मगदूम यांच्यासह सदस्यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा