अनिल शिंगाडे , जिल्हा संयोजक – दिव्यांग विकास आघाडी , सिंधुदुर्ग .
पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नव्हेंबर ” *दिव्यांग संपर्क अभियान* ” .
भाजपा युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस दिव्यांगांसोबत केक कापून साजरा करणार .
भाजपा दिंव्याग विकास आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने १५ ऑक्टोबर – जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त कसाल बाजारपेठ मधील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून , जिल्हा भरातील अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात येणार आहे . तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दिंव्यागांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे .
*दिंव्याग संपर्क अभियान*
जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नव्हेंबर या कालावधीत जिल्हा भरातील दिव्यांगांशी संपर्क केला जाणार आहे . तसेच जे दिव्यांग स्वतःचा उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांना केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे . तसेच दिव्यांगांना स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे .
योगायोगाने दिनांक १५ ऑक्टोबर रोजीच भाजपाचे युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस दिव्यांगांसोबत केक कापून साजरा करण्यात येणार आहे .
भाजपा दिंव्याग विकास आघाडी ची जिल्हा पदाधिकारी बैठकीत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी मार्गदर्शन केले . यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर , जिल्हा का.का.सदस्य सचिन भाई तेंडुलकर , कुडाळ चे राजेश पडते तसेच दिंव्याग आघाडीचे सरचिटणीस शामसुंदर लोट , सदानंद पावले , प्रकाश वाघ , सुनील तांबे , संगीता संजय पवार , स्वाती निलेश राऊळ इत्यादी उपस्थित होते .