You are currently viewing राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिरासाठी 20 ऑक्टोबर पूर्वी  अर्ज सादर करावेत

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिरासाठी 20 ऑक्टोबर पूर्वी  अर्ज सादर करावेत

 – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी 

कोविड-19 प्रादुर्भावामुळे क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर कार्याक्रम झालेले नाहीत. त्यामुळे  सन 2022-23 या वर्षात राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळांमधील क्रीडा विषयक अर्हता धारण करणाऱ्या व किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांकडून 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. तसेच जिल्ह्याच्या dsosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.

                राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवार्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठभ्‍ पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क्र.6(5) नुसार खेळामधील बदलेले आधूनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षाकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्त्रावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यास्तव राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीर कार्याक्रम आयोजीत करण्यात आला आहे.तरी पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन,जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा