You are currently viewing कुडाळात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नवीन अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

कुडाळात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नवीन अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे व कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा नगराध्यक्ष बसविणारे आमदार सतेज पाटील कुडाळ तालुका दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून या दौरा यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.

सकाळी आठ वाजता कोकणकन्या रेल्वेने कुडाळ रेल्वे स्थानकावर आगमन तिथून एमआयडीसी विश्रामगृहावर पदार्पण होणार असून सकाळी १०.३० वाजता कुडाळ विश्रामगृह येथून टू व्हीलर रॅलीने कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडे नवीन अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थितीत होणार आहे. ११.३० वाजता कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे.

तर दुपारी १२ ते १:०० जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक ते दोन एमआयडीसी विश्रामगहावर आराम नंतर २ ते ४ सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तालुका वार आढावा बैठक पार पडणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती केंदिय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, तसेच विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अभय शिरसाठ, विजय प्रभू, आफ्रीन करोल, चंद्रशेखर जोशी, प्रकाश जैतापकर, सुंदर वल्ली स्वामी यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा