You are currently viewing विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी याना राष्ट्रीय ‘परंपरा पुरस्कार’ प्रदान

विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी याना राष्ट्रीय ‘परंपरा पुरस्कार’ प्रदान

ओटवणे प्रतिनिधी

विलवडे गावचे सुपुत्र तथा मुंबई महापालिकेचे विशेष कार्य अधिकारी (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. सुभाष दळवी यांनी लोकसहभागातून स्वच्छता चळवळीत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना नवी दिल्ली येथील परिचय फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील ‘परंपरा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला पद्मश्री श्रीमती शोवना नारायण, सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर फाटक, परिचय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. रोसलीन पटसानी मिश्रा तसेच इतर मान्यवर आणि परिचय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुभाष दळवी यांना हा पुरस्कार सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर फाटक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष दळवी यानी हा पुरस्कार मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता, कर्मचारी व सफाई कर्मचारी, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे संस्थाचालक व त्यांचे सफाई मित्र यांना समर्पित करीत या सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकसहभागातून स्वच्छता चळवळीत सर्वोत्तम कार्य करू शकल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा