*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक…श्रीशब्द समूह सह समन्वयक लेखक कवी दीपक पटेकर लिखीत अप्रतिम मधुसिंधू काव्यरचना*
*मधुसिंधू काव्यरचना*
*तगमग*
मेळ असावा
मनाचा मनाशी
स्पर्श न तनाशी
अजाण व्हावा …१
मनाच्या भिंती
अभेद्य अखंड
विध्वंस प्रचंड
अंतरी स्थिती …२
कोण समजे
अस्वस्थ मनास
सर्वस्व पणास
लावा उमजे …३
ठेवीती नावे
उगा नित्य दुजा
मनानेची खुजा
कुणी नसावे …४
गाठी अज्ञान
समजती ज्ञानी
श्रुति गुरुवाणी
होती सज्ञान …५
देखावे खोटे
फसवे हसणे
मनात नसणे
मोडती बोटे …६
प्रश्न फुकाचे
छळतील राती
रक्ताचीच नाती
दुःख कुणाचे ….७
©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६