You are currently viewing खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मानले आभार…

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मानले आभार…

मुंबई

सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासननिर्णय आज निर्गमित करण्यात आला.त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शासननिर्णयाची प्रत खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्त केली.तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस लागणारा निधी कमी पडू देणार नाही त्याचबरोबर लवकरच या महाविद्यालयाच्या उभारणीला सुरुवात करूयात असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी यावेळी आश्वाशीत केले.
याप्रसंगी खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा