You are currently viewing पिनकोड

पिनकोड

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*पिनकोड*

आम्ही आपसात
भांडत होतो
तो आमच्या घरी
आपला बिछाना
अंथरत होता
आम्ही भांडता भांडता
भांडी बाहेर
फेकत होतो.
तो स्वयंपाक घरात
आपला स्वयंपाक
करीत होता
आम्ही भांडता भांडता
बाहेर आलो
तो दार बंद
करुन जेवायला
लागला
आम्ही भांडत
रागाच्या इर्शेत
बेघर झालो
त्याने आमच्याच
घरात
घरकुल बसवलं
आम्ही गाव गाव
फिरतोय
गुळकरी होऊन
तो गावकरी
म्हणून मिरवतोय
लोक घाटी म्हणून
चिडवतात.
या भांडणाने आम्हाला
परकं केलं
आम्ही खिशात
गावचा पत्ता
घेऊन फिरतोय
तो माझं गाव म्हणतो
त्याचा पिन कोड
स्थिर राहिला.
आमचा पिनकोड
बदलतोय.
लक्षात राहत नाही
आता आम्ही ….
कोणाही बरोबर
भांडत नाही.
तरीही पिनकोड
स्थिर होत नाही
सारा परखा मुलूख
कोणीच ओळखत
नाहीत ? अनोळखी
शहरात गावचा
पिनकोड विसरूनच
गेलो कायमचा.

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा