मालवण :
मालवण शहरातील भरड नाका येथे २१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्लास्टीकच्या कंदिलाला स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. साधा कागद, रंगीत कागद, बांबुच्या काठ्या यांचा वापर करून बनविलेले आकाश कंदील स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.
शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय गटातील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० रूपये तर खुल्या गटातील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रूपये व इतरही आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर यांच्याकडे द्यावीत. अधिक माहितीसाठी ९३७०४२५९९० येथे संपर्क साधावा.