You are currently viewing मालवणात नरकचतुर्दशी निमित्ताने 23 ऑक्टोबर रोजी “इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा”

मालवणात नरकचतुर्दशी निमित्ताने 23 ऑक्टोबर रोजी “इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा”

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आयोजन..

 

मालवण :

 

मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने नरकचतुर्दशी निमित्ताने 23 ऑक्टोबर रोजी इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विजेत्यांवर हजारोंच्या बक्षीसांचा वर्षाव होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करण्यास मनाई आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ८,८८८ रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ४,४४४ रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास २,२२२ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबरला रात्री ९ ते १२ यावेळेत वायरी रोड, भरड मालवण येथे परीक्षण करण्यात येणार असून बक्षिस वितरण मालवण बंदर जेट्टी येथे करण्यात येणार आहे. तरी नाव नोंदणी साठी पंकज गावडे ७९७२८६११२४, शुभम लुडबे – ९७६४१४८७८२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा