You are currently viewing कासार्डे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत अंतरराज्य शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

कासार्डे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत अंतरराज्य शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते गौरव

तळेरे: प्रतिनिधी

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत उर्फ बाबू सावंत यांना बेळगावी येथील रुलर डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ अँड नॅचरल डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावी या संस्थेच्यावतीने गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य अंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘अंतरराज्य शैक्षणिक गौरव पुरस्कार सन-२०२२’ने सन्मानित करण्यात आले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मैसुर फेटा व चंदनाचा हार घालून सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी व्यासपीठावर
माजी खास.आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर,आम. निलेश लंके, माजी आम. संजय पाटील, माजी खास. अमरसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावर, विलासराव पाटील, राजस्थानाचे डॉ.पवन शर्मा,श्री.शेख आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर तसेच सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर,स्थानिक व्यवस्था समिती आणि शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य मधुकर खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशांत सावंत यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कासार्डे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत यांचा आंतरराज्य शैक्षणिक गौरव पुरस्काराने सन्मानित करताना माजी मुख्यमंत्री पार्सेकर, केंद्रीय मंत्री सावनूर सोबत इतर मान्यवर

Advertisement

 

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा