You are currently viewing अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान

अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान

कणकवली

कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार यावर्षी चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला आहे.आज

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावर, विलासराव पाटील, आमदार निलेश लंके, डॉ पवन शर्मा,शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.

एकूण कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन राज्यांतील 120 विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कार वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला आहे.

यावेळीही कणकवली तालुक्यातील असल्य सरपंच पंढरी वायंगणकर यांना व ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .याच वर्षी आपल्या भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या सरपंचांना सन्मानित करण्यात आले होते. यातही असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचाही समावेश होता.

आता तर कर्नाटक गोवा महाराष्ट्र या तीन राज्याच्या वतीने आंतरराज्य सरपंच गौरव पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आल्याने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हा सन्मान स्वीकारताना बरोबर असलदे उपसरपंच संतोष परब ,ग्रामसेवक आर.डी. सावंत, लिपिक मधुसूदन परब , तुकाराम तुप्पट आदी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा