सावंतवाडी
वस्तीच्या ठिकाणी घुसलेल्या सापाला पकडुन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करणार्या आठ सर्पमित्रांना हिंगोली येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाकडुन “द रियल हिरो” हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. अनिल गावडे (कुडाळ-पिंगुळी), महेश राऊळ (वेंगुर्ला-तुळस), रविंद्रनाथ रेडकर (सातार्डा), स्वप्नील गोसावी (चिंदर-मालवण), दीपक दुतोंडकर (आडेली-वेंगुर्ला), प्रदीप बाणे (पडेल-देवगड), यज्ञेश खरात (कणकवली), विठ्ठल गवस (झोळंबे-दोडामार्ग) या सर्पमित्रांचा यात समावेश आहे. “द रियल हिरो २०२२” या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्पमित्रांना मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सर्प अभ्यासक जागतिक सर्प तज्ञ निलीमकुमार खैरे, डॉ. संजय नाकाडे. श्री देवदत्त शेळके, डॉ. श्रीधर कंदी, श्री गणेश मेहंदळे, डॉ. म्हस्के, आमदार संजय बांगर, सर्प अभ्यासक डॉ. कुणाल साळुंखे, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आयोजक श्री. विजयराज पाटील उपस्थित होते.