You are currently viewing कुडाळ स्टार्टअप बूटकँम्प सादरीकरणासाठी नोंदणीकृत उमेदवारांनी सहभागी व्हावे

कुडाळ स्टार्टअप बूटकँम्प सादरीकरणासाठी नोंदणीकृत उमेदवारांनी सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील नवउद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हयातील नोंदणीकृत उमेदवारांचे बूटकँम्प व सादारीकरण  गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांनी स्टार्टअप बूटकँम्प व सादरीकरणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

                या  कार्यक्रमाचा पहिला भाग स्टार्टअप व्हॅन मार्फत जनजागृतीचा कार्यक्रम जिल्ह्यात पार पडलेला आहे. स्टार्टअप बूटकॅम्प व सादरीकरणानंतर जिल्ह्यातून अव्वल तीन विजेते घोषित केले जाणार आहेत जे राज्य स्तरावरावरील सादरीकरणात सहभागी होणार आहेत. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शास्वत विकास, (कचरा व्यवस्थापन, स्वच्छता पाणी,ऊर्जा ई.) ई प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, आणि गतिशीलता, इतर कुठलीही समस्या व त्यावरील उपाय जो नाविन्यपूर्ण असेल.

                विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहिर केले आहे. या धोरणाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित उद्‌योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्सासाठी, तसेच त्यांच्या स्टार्टअप स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने स्टार्टअप यात्रचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी  02362 228835, 94 03350689 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा