आज सकाळीच भ्रमणध्वनी वाजला. समोरून आवाज आला.आपला विकास नाईक गेला.विश्वास बसेना.परत काय विचारले.माझे पाय थरथरत होते. खिन्न मनाने व्यथित होऊन पाहिले असता त्याच्या आठवणीने मन भरून आले.डोळ्यात दुखः तरळत होते.काय बोलू काय लिहू शब्द सुचेनासे झाले.त्यांच्या कुंटुबावर दुखःचा डोंगरच कोसळला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील जांभळवाडीतील नाईक *”हळणकर*” कुंटुबिय म्हणजे दातृत्व,कतृत्व व डेगवे गावाच्या शिरपेचातील मानाचा तुरा;असं म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गावातील *नाईक कुंटुबिय* म्हणजे गावाच्या जडणघडणीत आपल्या परीने खारीचा वाटा उचलणारे कुंटुबिय होय.
स्वातंत्रपुर्व काळापासून या घराण्याला थोडी त्यागाची पार्श्वभूमी आहे. १८५७ मध्ये गावातील एका घराण्यातील व्यक्तीने गावातून घोड्यावरुन जाणाऱ्या एका गोर्या अधिका-यावर गोळी झाडली.त्यामुळे गावातील लोकांना त्या गोष्टीचा त्या वेळी फार त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या गावातील *हळणकर* कुटुंबातील पूर्वजांना हि गोष्ट त्या काळी सहन झाली नाही.त्यामुळे त्यांनी सदर गोळी आपणच झाडली आहे;असे निक्शून त्याकाळी सांगितले.त्यामुळे त्यां कुटुंबाला फार मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
त्याकाळी त्यांना जवळपास असलेल्या काज-याच्या झाडावर फासावर लटकविले आहे.असे हे समर्पित भावनेने गावासाठी त्याग व बलिदान करणारे” नाईक-हळणकर” कुटुंबीय आहे.
ती प्रथा परंपरा आजही त्या कुंटुबियानी जपली आहे. हे विशेष होय. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यात ते आपला खारीचा वाटा उचलीत आहेत.
श्री स्थापेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे ठरविले.त्या कार्याकरीता त्या हळणकर कुटुबीयानी भरीव अशी देणगी देऊन आजच्या समाजासमोर “दातृत्वाचा आदर्श” घालून दिला आहे.
विकास नाईक व मी बालपणीचे “वर्ग मित्र” आहोत.त्यामुळे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या प्रत्येक कार्यात तो गेली २५-३० वर्षे अग्रभागी आहे.त्याची “नंदादीप” वाचनालयाच्या प्रगती करीता साथ मोलाची लाभली आहे. त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्याची बातमी मला मिळते. तो व्यवसायाने श्री माऊली प्रिंटिंग प्रेस वाला होता.सुरुवातीला त्यांनी काही काळ नोकरी केली.परंतु नवीन आव्हाने स्विकारण्याचा त्याचा स्थायीभाव आहे
.एका जिद्दीने पेटून सुरुवातीला” अवि”नावाने ग्राफिक्स प्रिटींगचा व्यवसाय सुरु केला.कामावरील अढळ निष्ठा,सहधर्म चारीणी सौ.प्रमिला ,मुलगा अक्षय,मुलगी शेफाली व भाऊ महेश यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हळणकर कुटुंबातील सर्वाचे सहकार्य या बळावरच एक मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने गिरण गावात योग्य दिशेला वाटचाल करीत असल्याने पाहून मला समाधान वाटते आहे.
प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात श्री स्थापेश्वरच्या वार्षिक जत्रेला हळणकर कुटुंबीय गावी येतात. श्री माऊली, महालक्ष्मी, स्थापेश्वर देवतेवर त्यांची अपार भक्ती.त्यांच्या कृपेने मी आज उभा असल्याची भावना त्यांच्या मनात ,मनात आहे.
डेगवे,गावातील आमच्या आंबेखणवाडीतील ग्रामस्थांनी श्री ब्राह्मणीतीर्थ क्षेत्राचा जिर्णोध्दार करायचा संकल्प केला.आणि मी सहज त्याची कल्पना त्याला दिली.त्याने कोणत्याही प्रकारची शंका न घेता सदर कल्पनेला उदार अंतकरणाने रुपये १५,०००/ ( १टि्प दगड)देऊन ख-या अर्थाने दातृत्वाचा आदर्श घालून दिला होता.त्यामुळे सदर बांधकाम करण्यासाठी आम्हाला व स्थानिक ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले होते.त्यांच्या नावांतच वि..का..स..आहे.त्यामुळे त्यांनी आज कृतीतून दाखविले..
कै.विकास नाईक यांना समस्थ डेगवे ग्रामस्थातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.व सर्व – नाईक- हळणकर कुटुंबीयांच्या दुखःत आम्ही सहभागी आहोत.
मृतांत्मास शांती लाभो.अशी परमेश्वर चरणीं प्रार्थना करीत आहे.!!
💐💐💐💐💐💐💐
—————————————-
*✍️उल्हास बाबाजी देसाई*
—————————————
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.
—————————————