*काव्य निनाद, सदाबहार काव्यांजली, काव्य स्पंदन समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री स्वाती गोखले लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*तिचे स्थान*
मनात तिच्या,खोल तळाशी, विचार होता साठला
हलकेच त्यावरी,खडा मारता,तरंगूनी वर आला…
लोटली कितीक वर्षे लग्नाला, बदलल्या सा-या गोष्टी
संसाराचा सराव झाला, तरीही गुपिते तिच्या ओठी…
क्षणिक सुखाचा मोह झाला,कळलेच नाही तिला
कधी कसा अपराध ठरला, उमगले नंतर तिला…
बालपणीचा सखा तो, सुखात सोबती झाला
चांदण्या रात्री तिला तो, फक्त आरशात दिसला…
होते तिच्या खेळ मनाचे, प्रतिबिंब तिला दिसले
मनात तिच्या स्थान फक्त,दर्पणाने तिला दाखवले….
सौ.स्वाती गोखले.
पुणे.