तन्मय गावडे व मंदार परब ठरले आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी
कणकवली :
विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची, वेगवेगळ्या स्पर्धांची गरज असते. असेच कार्य मागील काही वर्षांपासून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केले जाते.
दरवर्षी प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने दिला जाणारा आदर्श विदयार्थी पुरस्कार मागील कोरोना आजार संक्रमनामुळे वितरित केला नव्हता. मात्र सरस्वती पूजनाचे औचित्य साधून संस्थेचे सदस्य प्रशांत गावडे यांच्या माध्यमातून जि. प. शाळा. हळवल नं. २ येथे २०/२१ वर्ष चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. तन्मय लक्ष्मण गावडे याला देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच २१/२२ वर्ष चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. मंदार मधुकर परब याला देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुतार, सहकारी शिक्षक श्री. सावंत, मा उपसरपंच, लक्ष्मण उर्फ प्रदिप गावडे, प्रशांत गावडे, सतीश गावडे, सिद्धेश परब, विजय परब ग्रामपंचायत सदस्या, सुजाता परब आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम जि. प. शाळा. हळवल नं. २ येथे पार पडला.