You are currently viewing हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटवा; हळवल भाजपा कार्यकर्त्यांचे प्रशासन यंत्रणेस निवेदन

हळवल फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटवा; हळवल भाजपा कार्यकर्त्यांचे प्रशासन यंत्रणेस निवेदन

तात्काळ कारवाई करून स्टॉल न हटविल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

 

कणकवली :

मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मागील काही महिन्यांपासून अपघातांचे स्तर सुरूच आहेत. आज पर्यंत साधारणतः त्याठिकाणी पाच ते सहा अपघात झाले. त्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये काहींनी आपले प्राणही गमावले आहे. मात्र एकंदरीत घटना पाहता तेथे झालेले अपघात हे रात्रीचे झाले त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे.

हळवल फाटा याठिकाणी असलेल्या स्टॉल वर गिऱ्हाईकांची मोठी ये – जा असते. असे असताना त्या ठिकाणी जर दिवसा अपघात झाले असते तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सुरुवातीला झालेल्या अपघातावेळी तेथील स्टॉल धारकांना प्रशासन यंत्रणेकडून स्टॉल हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्या ठिकाणच्या स्टॉल धारकांनी त्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे आज ग्रामपंचायत सरपंच हळवल, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली, कणकवली पोलीस निरीक्षक, तहसीलदार कणकवली, प्रांताधिकारी कणकवली यांना निवेदन देण्यात आले.

प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणचे स्टॉल हटवावे व पुढे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वळणावरील स्टॉल हटवून सहकार्य करावे तसेच होणारी जीवित व वित्त हानी टाळावी. तसे न केल्यास जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात असा इशाराही यावेळी दिला आहे. एकंदरीत स्थिती पाहता आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हळवल फाट्यावरील स्टॉल हटवून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपा कार्यकर्ते हळवल भाजप कार्यकर्ते शशिकांत राणे, मिलिंद मेस्त्री, प्रदीप गावडे, सुदर्शन राणे, श्यामसुंदर दळवी, शिवा राणे, वामन परब, उमेश घाडीगावकर, पूजा घाडीगांवकर, गणेश गावडे, समर्थ राणे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा