आठवी माळ
श्री महागौरी
श्वेते, वृषे, समारुढा, श्वेताम्बर धरा l
शुचि: महागौरी शुभ दध्यान्महादेव प्रमोददा ll
भगवती दुर्गामातेचे हे आठवे शक्तिरूप. हिचे वय आठवर्षे मानले जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी हिची पूजा केली जाते.
हया देवीचा वर्ण गौर आहें. तिचे वाहन वृषभ आहें. तिला चार भुजा आहेत. उजव्या बाजूचा वरच्या हाताची अभय मु द्रा आहें. तर उजव्या खालच्या हातात त्रिशूल आहें. डाव्या बाजूच्या वरच्या हातात डमरू आहें तर खालच्या हाताची वरमुद्रा आहें. देवींची मुद्रा अतिशय शांत आहें. महागौरी नें पती रूपात शंकर प्राप्त व्हावे म्हणून कठोर तपस्या केली. आणि कठोर तपस्येने तिचे शरीर काळे पडले. तिला शंकर प्रसन्न झाले मग त्यांनी तिला गंगेने स्नान घातले. आणि मग तिचा वर्ण गौर झाला. आणि कांती पण सतेज व तेजोमय झाली. म्हणून यील महागौरी असे नाव पडले.
महागौरी अमोघ फलदायीनी आहें. तिच्या पुजनाने भक्तांचे सर्व दोष नाहीसे होतात.
यां देवी सर्वभुते्षू माँ गौरी रुपेण संस्थीता नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः ll
कल्पना तेंडुलकर
ओरोस