You are currently viewing रंग केशरी

रंग केशरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*

*रंग केशरी*

सुंदर किती पहाट…घालूनी केशर सडे शिंपली पूर्व दिशेची वाट…….
ही बालभारती त शिकलेली कविता आजही मनात ताजी आहे.केशरवाट,क्षितिजाच्या भाळावरील केशर गोल…केशरी रंगाने पहाट प्रसन्न होते जणू…!
अग्नीचा रंग केशरी..पोटाची भूक शांत करतो,चुलीतील केशरीलाल ज्वाला गृहिणीचं कसब पणाला लावते.चटके सोसत आई अन्नपूर्णा होते.मुखी समाधानाचा घास जातो….
सर्व कष्टकर्यांचे आराध्यदैवत अबीरबुक्क्यासवे केशरी टिळा त्याला विलक्षण शोभून दिसतो.केशरी आंबा तर फळांचा राजाच…संत्री, मोसंबी, पपई ,गाजर,अनेक पोषक तत्त्व या केशरी रंगात..नैसर्गिक मिळतात.
पदार्थतही,लाडू,जिलबी,बुंदी, श्रीखंड…किती तरी गोडात केशरीरंगाला प्राधान्य….
फुलांमधे हिरव्या पानात शोभणारे केशरी गुच्छ मन मोहून घेतात.अबोली,जास्वंद..रानातला केशरी पळस तर अग्नी शिखा म्हणून भर उन्हात तेजाळतो.
केशरी ,भगवा तेजाचा,त्यागाचे प्रतीक…
तो राष्ट्राचा,ऋषीमुनींचाही आवडता…. संन्यस्त वृत्तीचं
संयमाचं प्रतिक!
आणि रजपूत वीर अटीतटीच्या लढाई ला केसरीया फेटा बांधून अखेरची लढाई लढायला गेले की त्यांच्या स्रिया जोहाराला सिध्द होत.पवित्र अग्नीच्या साक्षीने शत्रू पासून स्वतःचे पावित्र्य रक्षणास सामुहिक रित्या जोहार करत व हसत लालकेशरी ज्वालांना समर्पित होत…केवढं महान बलिदान हे!
केशरी रंग अनेक रंगात उठून दिसणारा, वैशिष्ट्य पूर्ण असा ….त्याग,समर्पण,
तेज,विरक्ती सारं काही सामावलेला..म्हणूनच दैदिप्यमान असा हा केशरी रंग……!

🌻🌻🌻☘️🌻🌻🌻☘️
लेखन…अरूणा दुद्दलवार
दिग्रस..यवतमाळ.
🌹🙏🌹

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा