वेंगुर्ला:
वेंगुर्ला तालुक्यात शिंदे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या शाखेची स्थापना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अशोक दळवी, किसन मांजरेकर, जि प सदस्य वर्षा कुडाळकर, जेष्ठ नेते महेश सामंत, सावंतवाडी शहर शहरप्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नीतीन मांजरेकर, सचिन वालावलकर, भोगवे सरपंच रुपेश मंडये, राजन पोकळे, नितीन शिरोडकर, माजी सभापती सुनील मोरजकर, विश्वास गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शालेय शिक्षणमंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, लोकांची कामे व्हावेत, लोकांना शाखेत येऊन आपल्या समस्यां मांडता याव्यात यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना शाखांची संकल्पना अस्तित्वात आणली. तोच वारसा आम्ही शिवसेना म्हणून पुढे चालवत असल्याचे सांगितले.