प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे भाजपाचे आवाहन
कणकवली : बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरावाड्याच्या निमित्ताने कणकवलीत वोकल फॉर लोकल या प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली भाजपाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाच्या निमित्ताने बचत गटांनी बनविलेल्या खाद्यपदार्थ व अन्य वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या निमित्ताने होणार आहे. महिला बचत गटांनी बनविलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी याप्रसंगी दिली. महिलांसह सर्वांनीच या प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटांनी बनविलेल्या उत्पादनांना खरेदी करा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व नवदुर्गा वस्ती स्तर संघ बाजारपेठ यांच्या महिलांनी देखील यात सहभागी होत त्यांनी तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, मेघा गांगण, मेघा सावंत, प्रियाली कोदे , राजश्री धुमाळे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, अभय घाडीगावकर, राजू पेडणेकर, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, श्यामसुंदर दळवी, समर्थ राणे यांच्यासह बचत गटाच्या महिला देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या.