You are currently viewing अटल वाटेवर भेटलेले सेवाव्रती…

अटल वाटेवर भेटलेले सेवाव्रती…

अटल वाटेवर भेटलेले सेवाव्रती…

समाजात निरपेक्ष भावनेने विविध क्षेत्रात काम करणारे असंख्य सेवाव्रती भेटले.. प्रत्येक महानुभावात काहीतरी युनिक अनुभवायला मिळालं. आपण आणि आपल कुटुंब एवढ्याच परिघात न रहाता परमेश्वराने आपल्याला हा सुंदर जन्म दिलाय त्याचा उपयोग समाजासाठीहि केला पाहिजे या भावनेने काम करणाऱ्या या सेवाव्रतींची प्रत्यक्ष भेट आठ महिन्यापूर्वीच झाली… सामाजिक कामाचा पिंड आणि कौटुंबिक अडचणी बाजूला ठेवून अडलेल्या पडलेल्याना निरपेक्ष भावनेने मदत करणे आणि मा. सुरेश जी प्रभू यांची प्रेरणा व आदर्श हे आम्हा दोघां वेड्याना जोडणारा समान दुवा.
कोकणातील वैद्यकीय सेवेपासून वंचित आणि गरजू रुग्णांना हातभार लावला पाहिजे म्हणून अमेय हे अहोरात्र झटत आहेत. या चळवळीत मी एक छोटासा बिंदू म्हणून काम करत आहे. पाच महिन्यापूर्वी माझे जेष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र भाजपाचे माजी सहसचिव आदरणीय शरदजी चव्हाण यांच्या सोबत माझ्या कोलगावं येथील निवासस्थानी आले होते.. सामाजिक कामावर आमच्या खुप गप्पा झाल्या. बोलता बोलता मी कोरोना काळात मदतकार्य करताना अडचणी तसेच रुग्णवाहिकेसाठी अव्वाच्या सव्वा मोजावी लागणारी रक्कम, औषधांचा तुटवडा, गरीब रुग्णांचे झालेली ओढाताण यावर चर्चा झाली… ही चर्चा एका मोठ्या सकारात्मक परिणामात मुर्त स्वरूपात येईल असं वाटलं नव्हतं.. पंधरा दिवसातच मला अमेय यांचा फोन आला.. “सरजी, ताबडतोब Ageas, Federal Life Insurance co. कडे CSR साठी प्रस्ताव तयार करा, आपल्याला रुग्णवाहिका उपलब्ध होईल”.. मी सलग पंधरा दिवस या विषयाच्या मागे लागून प्रस्ताव पाठवला. काही तांञिक अडचणी होत्या त्यापण अमेय यांनीच सोडवल्या.. स्वप्न साकार झाल… किरात ट्रस्ट, वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान या दोन्ही संस्थासाठी दोन रुग्णवाहिका येत असून रविवार दिनांक ९ आॅक्टोबर रोजी कोकणसुपूञ आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहे.
सामाजिक बांधिलकीने वेडे झालेले डाॅ. अमेय एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर सांगली येथील तीनशे छापन्न बेडेड अद्ययावत हाॅस्पिटलच्या सहकार्याने, अटल प्रतिष्ठान व सावंतवाडी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या हाॅस्पिटलमधील तब्बल विविध तज्ज्ञ अशा पंधरा निष्णात डॉक्टराना पाचारण करून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला. त्यासाठी लागणाऱ्या मोफत औषधोपचारासाठी प्रायोजक पण शोधले. वेंगुर्ला येथील श्री मोहन होडावडेकर यांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी काम करणाऱ्या माझा वेंगुर्ला या समुहा बरोबरही काही उपक्रम ते राबवित आहेत…
अशा आमच्या सेवाव्रती मिळाला आज वाढदिवस… परमेश्वर त्याना अशीच सातत्याने जनसेवा करण्यासाठी उंदड आयुष्य देवो हीच मनोमन प्रार्थना…
… DR. HAPPY BIRTHDAY..
.. ADV. NAKUL PARSEKAR

प्रतिक्रिया व्यक्त करा