You are currently viewing तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तळेरे हायस्कूलचे यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तळेरे हायस्कूलचे यश

वामनराव महाडीक विद्यालयाची विज्ञान प्रतिकृती तालुक्यात प्रथम

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , तळेरेच्या अँटी स्लिप अलार्म फॉर ड्रायवर्स या विज्ञान प्रतिकृतिने प्राथमिक विभागातून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित कणकवली तालुकास्तरिय ४९ वे विज्ञान प्रदर्शन खारेपाटण हायस्कूल येथे पार पडले. यामध्ये तळेरे हायस्कूलच्या उच्च प्राथमिक विभागातून वाहन चालक प्रतिबंधक प्रणाली म्हणजेच अँटी स्लिप अलार्म फॉर ड्रायवर्स विज्ञान प्रतिकृती इयत्ता आठवीतील विद्यार्थीनीं मनस्वी बारस्कर हिने प्रदर्शनात मांडली होती . रात्रीच्या प्रवासात चालकाला डुलकी येते आणि अपघात होऊन जीव गमवावा लागण्याच्या घटना नेहमीच आपल्या कानावर येतात. या ‘अँटी स्लिप अलार्म’ च्या माध्यमातून झोप आल्याने होत असलेले रात्रीचे अपघात टाळने शक्य होतील याची प्रात्यक्षिकासह माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी तिला विद्यालयातील शिक्षिका एस. यु. सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुक्यातून जवळपास २९ शांळाकडून आपल्या विज्ञान प्रतिकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले . तसेच यावेळी घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धेत प्राथमिक गटातून मयुरी संतोष तळेकर हिने द्वितीय तर वक्तृत्व स्पर्धेत स्नेहल संतोष तळेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला . या विद्यार्थ्यांना शिक्षिका शितल जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तळेरे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरुणकर , शरद वायंगणकर , संतोष तळेकर, संतोष जठार , निलेश सोरप , उमेश कदम , प्राचार्य अविनाश मांजरेकर, सी. व्ही . काटे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक , ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांनीं अभिनंदन केले .

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा