*वक्रतुंड साहित्य कला मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा. डॉ.सतीश शिरसाठ लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*खंजन मंडल का मेला ?*
मी काॅलेजात शिकत असताना माझ्या एका मित्राने एका इंग्रजी वर्तमानपत्रात की,नियतकालिकात
(नक्की आठवत नाही आता )एक लेख आल्याचं सांगितलं,
” Why Khanjan Mandal had to die?”
माझ्या मते बिहारमधील ही घटना असेल. खंजन मंडल हा खेड्यातील लहान शेतकरी.कुणाच्या अध्यात नाही की,मध्यात नाही असा साधा सरळ पापभिरू माणूस. गावातील एका मोठ्या धनदांडग्या माणसाने त्याच्या जमीनीवर कब्जा केला.खंजन मंडलनं त्याला खूप सांगून पाहिलं.काहीच उपयोग झाला नाही.
एक दिवस खंजन मंडलची हत्या झाली.
त्या लेखात पुढं म्हटलं होतं की, आपल्या देशात असे अनेक खंजन मंडल आहेत.त्यांचे नेमके ठावठिकाणेही आम्हाला माहीत आहेत. पण ते जाहीर केले तर अशांची हत्या होईल.
हा खंजन मंडल माझ्या कवितेचा विषय झाला.
ती माझी कविता ;
*खंजन मंडल का मेला ?*
खंजन मंडल का मेला ?
तो मुळी वेडाच होता
पिचलेले दंड थोपटत
इथला किल्लाच पाडायला निघाला होता ,
तो मुळी वेडाच होता.
खंजन मंडलनं भांडायचं नसतं ,
खंजन मंडलनं मांडायचं नसतं,
पिढ्यान पिढया साचलेलं ,
खंजन मंडलनं सांडायचं नसतं.
खंजन मंडलनं भोगायचं असतं,
खंजन मंडलनं मागायचं असतं,
बापजादे जसे वागले-
खंजन मंडलनं तसंच वागायचं असतं,
जमल्यास त्यानं जगायचं असतं ,
खंजन मंडल,
तुझ्या मालकीचं नव्हतं आभाळ,
तुझ्या मालकीची नव्हती भुई,
होती फक्त एक सुई,
वीत दिड वीत जिंदगीला टाके घालत ,
तुझा बाप बसायचा ,
आणि तू वेडया –
हातात पलिता घेऊन,
व्यवस्थेच्या सुडीलाच भिडला ,
खंजन मंडल इथच चुकला.
(मग प्रश्न पडतो की,या व्यवस्थेला नकोय का खंजन मंडल ? नाही)
या व्यवस्थेला हवा आहे ,
खंजन मंडल नेहमीसाठीच,
काटकोनात वाकायला,
गाव झाकायला,
चिखलातले काटे वेचायला
आणि –
वेळ पडेल तेव्हा,
त्याच्याच मालकीची
पोत तोडून ,
ओघळलेल्या मण्यांत धागा ओवायला ,
खंजन मंडल का मेला ?
तो मुळी वेडाच होता.
तो मुळी वेडाच होता.
(प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ)
Advertisement
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*