मालवण :
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे या महाविद्यालय विद्यार्थिनीनी मालवण येथील कट्टा महाविद्यालय या शाळेत कोकेडमा कसा बनवायचा व त्याचे गुणधर्म काय आहेत हे समजावले. हा कार्यक्रम राबविण्याचा उद्देश असा की मुलांन मध्ये झाडांविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच कोकेडामा बनवून भविष्यामध्ये आपण त्याचा एक पूरक व्यवसाय कसा करू शकतो. ह्या गोष्टीचा प्रशिक्षण दिले. तर हे प्रशिक्षण उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे या महाविद्यालय विद्यार्थिनी कविता मोरे, प्रियांका राऊत,लीना धुरी, सुंन्नवी सांगळे, पंचमी नायर, अनुजा तायशेटे, अर्चना सी.बी. यांनी घेतले. तसेच प्रशिक्षण घेताना केंद्रप्रमुख सावंत सर, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश ठाकूर आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाची उपस्थिती दाखवून सहकार्य केले.