वेंगुर्ला
महिला काथ्या क्वायर क्लस्टर चे चेअरमन, काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक कृषिभूषण एम. के. गावडे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आले. वाढदिवसानिमित्त नारळमित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जुवेकर सर यांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. त्या शिक्षणातून कामाची योग्य संधी कशी मिळेल याबद्दल मार्गर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रज्ञा परब यांनी केली. जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच नेहरू युवा पुरस्कार विजेते डॉ. संजीव लिंगवत, दीपलक्ष्मी पडते, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सुजाता देसाई, नितीन कुबल, नम्रता कुबल, श्री. पालव, क्वायर संघातील महिला, कर्मचारी वर्ग तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, नारळ मित्र तसेच महिला काथ्या कामगार व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गावडे यांना शूभेच्छा दिल्या. श्री गावडे यांनी ग्रामीण भागातील होतकरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. सहकारातील त्यांची कामे पाहता त्यांनी बहुतेक अशी उल्लेखनीय कामे करून दाखवली आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. एम. के. गावडे यांनी वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना म्हणाले की पुढील ५ ते १० वर्षात सर्व लोकांनी एकत्र येऊन कामे केलीत तर केरळमध्ये जसे क्वायर युनिट आहेत तसे आपल्या महाराष्ट्रात देखील होईल. आंबोली व करुळ घाट हे दोन्ही घाट मजबूत करण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे त्यामध्ये पावसाळ्यात होणाऱ्या अडचणींवर उपाययोजना म्हणून त्यावर ‘रिटर्न वॉल बांधणे, तसेच पर्यटकांना हायवे पासून बीच पर्यंत जाणारे रस्ते रुंद व सरळ करण्यासाठी उपाय करावे, तसेच येणारा पर्यटन निधी हा पी. डब्यू. डी., एम आय. डी. सी., एम. एस. इ. डी. सी. एल., आय टी डी सी, एम टी डी सी या सर्व विभागांनी एकत्र येऊन तो पर्यटन निधी खर्च करावा. तसेच आपल्याकडील असलेले काथ्या उद्योग, काजू उद्योग, पर्यटन उद्योग हे उद्योग जेव्हा वाढतील तेव्हाच आपला माणूस योग्य मोबदला कमविण्यासाठी खंभिर होईल, तसेच प्रत्येकाने नारळ हे शास्वत पीक घेणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या बहुतेक संधी आहेत त्यामुळे त्या संधी योग्य प्रकारे कमावा, तसेच शेतजमिनीचा तुकडा उघडा टाकू नका त्याच्यावर श्रम करा जमीन म्हणजे आपली माय व त्या मायेची सेवा केली तर तिच माय आपल्याला कधीही उपाशी ठेवणार नाही. तसेच सध्याच्या राजकारणात पक्षभेद विसरून महिला व तरुणाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे आणि आभारपर प्रतिपादन केले.