You are currently viewing पर्यटन महासंघाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चळवळ पर्यटन वाढीसाठी उपयुक्त

पर्यटन महासंघाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चळवळ पर्यटन वाढीसाठी उपयुक्त

पर्यटन मंञालय भारत सरकारचे सहसंचालक श्री वेंकटेश दत्ताञय यांचे प्रतिपादन….

सिंधुदुर्ग हा या देशातील पहिला वहिला पर्यटन जिल्हा. अफाट सृष्टिसौंदर्य, फळबागा, जैवविविधता आणि पर्यटकांना आकर्षित करणारे मनमोहक सागर किनारे यामुळे जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला फार मोठी संधी आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात पर्यटन व्यवसायिकाना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. यातूनही मार्ग काढून पर्यटन व्यवसायिक पुन्हा एकदा उभारी घेत आहेत आणि या व्यवसायिकाना पाठबळ देण्याचं काम पर्यटन व्यवसायिक महासंघ करत आहे हे कौतुकास्पद आहे. पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या सहकार्याने संपूर्ण कोकणात भारत पर्यटन मंञालय अनेक उपक्रम राबविण्यार असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या पर्यटन मंञालयाचे सहसंचालक मा. श्री वेंकटेश दत्ताञय यांनी केले. भारत सरकार पर्यटन मंञालय व पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने निवास आणि न्याहारी धारकांच्या देवबाग, मालवण येथे आयोजित केलेल्या एक दिवशीय कार्यशाळेच्या उदघाटन पर संबोधनात ते बोलत होते.
पर्यटन मंञालय भारत सरकारच्या पश्चिम विभागाच्या माजी संचालक मा. श्रीमती निला लाड यांनी जिल्ह्यातील पर्यटनाबाबत सकारात्मक विचार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पर्यटन मंञालय भारत सरकारच्या पश्चिम विभागाच्या सहसंचालक मा श्रीमती भावना शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रशासन स्तरावर सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य देण्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे आश्वासित केले.
पर्यटन अधिकारी सौ. मुरूडकर यांनी केंद्र सरकारच्या निवास व न्याहारी या योजनेबाबत आॅनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र टूर्स व ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष श्री उदय कदम यांनी पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळवून देण्यासाठी कमी खर्चात कशा टुर्स उपलब्ध करून देता येतील याबाबतचे मार्गदर्शन केले.
अभिषेक भोसले , गोवा व उमेश बोडके नाशिक यांनी पर्यटकांना सुलभ व चांगली सेवा देण्याबाबत तपशीलवार माहिती दिली.
पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आपल्या प्रास्ताविक संबोधनात आपल्या महासंघाला शासन स्तरावर बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लवकरचं राज्याचे पर्यटन मंत्री मा. लोढा यांच्याबरोबर महासंघाची बैठक आयोजित करून पर्यटन वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्गचे खादी ग्रामोद्योगचे अधिकारी श्री कर्णिक यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
महासंघाचे जिल्हा कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर यांनी महासंघाने पर्यटन वृध्दिसाठी व पर्यटन व्यवसायिकासाठी गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच सभासद नोंदणीचे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी गेली चाळीस वर्षे पर्यटन चळवळीत प्रभावी काम करणारे डि. के. टूरिझमचे श्री डि. के. सावंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच फोटोग्राफी व केक बनविणे या स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यशाळेत दीडशेहून जास्त निवास व न्याहारी धारक उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष श्री डि. के. सावंत, सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर, श्री कमलेश चव्हाण, तारकर्ली पर्यटन संस्थेचे श्री सहदेव साळगावकर, मालवणचे अध्यक्ष श्री अविनाश सामंत, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, वेंगुर्ल्याचे अध्यक्ष श्री महेश सामंत, मालवण शहर अध्यक्ष श्री. मंगेश जावकर, सौ.मेघा सावंत सौ.विद्या फर्नांडिस व महासंघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा