कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तालुका पशुवैद्यकीय विभागाला भेट दिली. गुरांना होणाऱ्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर व लसिकरणाबाबत परिपुर्ण आढावा घेतला. सद्यस्थितीत राज्यभर जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे.कोकणपट्याच्या तुलनेत घाटमाथ्यावर हा आजार अधिक वाढला आहे.त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी केल्या.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर ठाकुर म्हणाले कि, कुडाळ तालुक्यात लम्पीचा अद्यापपर्यंत प्रादुर्भाव नाही आणि लम्पी आजार आलाच तर तो बरा होतो. जनावरे मरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुका संघटक बबन बोभाटे, अनुप नाईक, शेखर गावडे,बाळा कोरगावकर,सुनील सावंत,सचिन कदम,दीपक आंगणे, योगेश धुरी बाबी गुरव आदि उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही अडचणी आहेत का? आतापर्यंत किती जनावरांना लसिकरण झाले? याबाबत आ.नाईक यांनी परिपुर्ण माहीती घेतली.यावेळी डॉ.ठाकुर म्हणाले कि, तालुक्यात एकुण ३५ हजार जनावरे आहेत.त्यामध्ये गायवर्गिय जनावरे आहेत त्यांनाच लसिकरण करावयाचे आहे.या ३५ हजार मध्ये १९ हजार जनावरे गाय वर्गिय आहेत. त्यात ४ हजार जनावरे गाबण व वासरे आहेत. उर्वरित १५ हजार जनावरांपैकी ६३०० जनावरांना लसी दिल्या आहेत.आता ८७०० जनावरांना लसी देणं बाकी आहे. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यात राज्य शासनाचे ८ आणि जिल्हा परिषदेचे १२ मिळुन २० दवाखाने कुडाळ तालुक्यात आहेत.आता १३ जनाच्या सहकार्याने तालुक्यात लसिकरण सुरू आहे. सन २०१९ मध्ये लम्पी आजार सिंधुदुर्गात आला होता त्यावेळी ८० टक्के जनावरांना लागण झाली होती. आता मात्र लम्पी येणार नाही अशी खात्री आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन यावेळी डॉ.ठाकुर यांनी केले.